बिहार विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा

September 6, 2010 4:09 PM0 commentsViews: 1

6 सप्टेंबर

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी आज निवडणुकीची घोषणा झाली. मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली.

बिहारमध्ये सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा 21 ऑक्टोबरला तर शेवटचा टप्पा 9 नोव्हेंबरला होणार आहे.

तर मतमोजणी 24 नोव्हेंबरला होणार आहे. 27 नोव्हेंबरला बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.

close