लगबग बैलपोळ्याची…

September 7, 2010 12:22 PM0 commentsViews: 6

7 सप्टेंबर

बळीराजाला शेतीच्या कामात मदत करणार्‍या बैलांचा सण म्हणजे बैलपोळा. या सणाची लगबग आता बाजारपेठांमधून दिसू लागली आहे.

बैलपोळ्याच्या तयारीसाठी सध्या गावागावांतील बाजारपेठा घुंघरमाळा, रंगीत गोंडे आणि विविध रंगांनी सजल्या आहेत.आपला बैल देखणा दिसावा यासाठी शेतकरी बाजारपेठेतील व्यापार्‍यांशी घासाघीस करत या वस्तू घेताना दिसत आहे.

त्यासाठी बैलाच्या शिंगांना धार काढणे आणि त्याच्या पायाला नाल ठोकण्यासाठीही अनेकजण बाजारपेठेत येत आहेत. राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा पोळा दणक्यात साजरा करण्यासाठी तो सरसावला आहे.

close