गोदावरी प्रदूषण जागृतीसाठी फिल्म

September 7, 2010 12:26 PM0 commentsViews: 103

7 सप्टेंबर

एकीकडे पवित्र जल म्हणून नावाजायचे आणि दुसरीकडे मात्र त्याची नासाडीच करायची, असा प्रकार नाशिकला गोदावरीबाबत कायम होतो.

गोदावरीचे प्रदूषण रोखणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश देणार्‍या गोदाई या फिल्मचे नाशिकमध्ये प्रकाशन करण्यात आले.

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने या फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. गोदावरीच्या प्रदुषणाबद्दल जनजागृती करणे आणि ते रोखणे हा या फिल्मचा उद्देश आहे.

close