बंदमुळे जनजीवन विस्कळीत

September 7, 2010 12:53 PM0 commentsViews: 1

7 सप्टेंबर

महागाईविरोधात आज देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. यात बँकांसह सर्वच सरकारी ऑफिसमधील कर्मचारी संपावर गेले आहेत.

मुंबईत या बंदचा फारसा परिणाम झालेला नाही. मुंबईतील वाहतुकीवर याचा काही खास परिणाम पडलेला नाही. पण कर्मचारी युनियनने पुकारलेल्या बंदचा प्रभाव मुंबई विमानतळावर चांगलाच जाणवत आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवेच्या वेळापत्रकात अनेक बदल केले आहे. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. किंगफिशरने 29 विमान उड्डाणे रद्द केली आहेत.

जेटनेही काही विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तर काही उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

मुंबईत फारसा परिणाम नाही

देशव्यापी संपात बहुतेक रिक्षा आणि टॅक्सी संघटना सहभागी झाल्या नसल्याने मुंबईत संपाचा फारसा परिणाम जाणवला नाहीभारत बंदच्या आवाहनाला मुंबई महापालिकेतही प्रतिसाद मिळाला नाही.

मुंबई महानगरपालिकेत रोजच्याप्रमाणे कर्मचारी हजर आहेत. तर तक्रार घेऊन येणार्‍या लोकांची गर्दीही नेहमीप्रमाणेच आहे.

close