मखर सजावटीतून शिक्षण

September 7, 2010 1:07 PM0 commentsViews: 186

मिलिंद तांबे, नवी मुंबई

7 सप्टेंबर

गणेशोत्सवात एक विशेष आर्कषण असते ते म्हणजे मखर सजावटीचे. कळंबोलीतील चार कॉलेज तरुणांनी घरच्या घरी वेगवेगळी मखरे बनविण्याचे काम सुरु केले आहे.

त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ते आपले शिक्षणे घेत आहेत. त्यांनी बनविलेल्या या मखरांना राज्यभरातून मागणी आहे. तर त्याच्या व्यवसायाचा टर्नओव्हर लाखो रुपयांपर्यंत पोहचला आहे.

वेगवेगळ्या आकारातील 1 ते 15 फुटांपर्यंतची मखरे ते बनवतात. यातून केवळ अडीच महिन्यांत 2 लाख रुपयांची उलाढाल होते. या तरुणांनी लाडक्या गणपती बाप्पाची सजावट आकर्षक करण्याचे काम तर केले आहेच.

शिवाय कला, उत्सव आणि व्यवसाय यांची चांगली सांगडही घातली आहे.

close