कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल

October 25, 2008 5:25 PM0 commentsViews: 6

कोल्हापूर जिल्ह्यातल्या दौलत सहकारी साखर कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीप्रमाणं दर दिला नाही, म्हणून कोल्हापूरच्या द्वितीय लेखा परीक्षकांनी ही कारवाई केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकाकडं तक्रार केली होती. त्यानुसार सर्व संचालक मंडळावर चंदगड पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close