नेवासा येथील दरोड्यात तिघांचा मृत्यू

September 7, 2010 3:20 PM0 commentsViews: 74

7 सप्टेंबर

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला.

प्राथमिक हा दरोडा दिसत असला तरी त्यांचा खून झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

नेवासा शहरातील गजबजलेल्या वस्तीत सोनावणे कुटुंबावर मध्यरात्रीनंतर 5 ते 7 दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यामध्ये सीताराम सोनावणे, मथुराबाई सोनावणे आणि त्यांचा मुलगा सुरेश यांना मारहाण केल्याने मृत्यू झालाय.

तर 8 वर्षाचा ऋषिकेश यामध्ये जखमी झाला. त्यांच्या तिघांच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आहेत आणि नंतर धारधार शस्त्राच्या हल्ल्याच्याही खुणा आहेत.

अशा प्रकारे या तिघांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंदर्भात नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेले गृहमंत्री आर. आर. पाटील घटनास्थळी भेट देणार आहेत.

close