नांदेडमधील शिक्षकांचे उपोषण सुरूच

September 7, 2010 3:25 PM0 commentsViews: 2

7 सप्टेंबर

नांदेडमधील शिक्षकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणाला बसलेल्या शिक्षकांपैकी 3 जणांची प्रकृती खालावली आहे.

त्यांच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हातील शिक्षक सेवक भरती प्रक्रिया राजकीय पक्षांनी उधळून लावली होती.

तीन महिने उलटल्यानंतरही हा प्रश्न अजून सोडवला जात नसल्याने 300 ते 350 भावी शिक्षकांनी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

close