स्वीमर बालकृष्णनवर हल्ला

September 7, 2010 3:29 PM0 commentsViews: 3

मीनाक्षी महादेवन, चेन्नई

7 सप्टेंबर

कॉमनवेल्थ आधीच भारतीय स्वीमर्स डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने भारतीय टीमला आधीच धक्का बसला आहे. त्यातच आणखी एक वाईट बातमी आहे.

नॅशनल स्वीमर बालकृष्णन अज्ञात व्यक्तिंनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्यामुळे बालकृष्णन कॉमनवेल्थमध्ये खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

नुकत्याच झालेल्या नॅशनल स्वीमिंग चॅम्पियनशिपमध्ये या खेळाडूने दोन गोल्ड मेडल्स पटकावले. पण कॉमनवेल्थमध्ये गोल्डन कामगिरी करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवण्याच्या बालकृष्णनच्या स्वप्नाला तडा गेला आहे.

रविवारी नेहमीच्याच वेळेला स्वीमिंगच्या सरावाला जाताना तीन अज्ञात व्यक्तिंनी त्याच्यावर हल्ला केला. क्रिकेटच्या स्टम्पने बालक्रिशनन याच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करण्यात आले.

त्याच्यावर हल्ला करणारे फरार झाले आहेत. हल्ल्याचे कारण कळून शकल्याने पोलिसांपुढील पेचही वाढला आहे.या हल्ल्यानंतरही बालकृष्णनने आशा सोडल्या नाहत.

पोलीस आपल्या परिने तपास करणार आहेत. पण महत्त्वाचा प्रश्न आहे, की कॉमनवेल्थ स्पर्धेआधी बालकृष्णन पूर्णपणे फिट होणार की नाही…

close