इकोफ्रेंडली गणेशाला मागणी

September 7, 2010 4:01 PM0 commentsViews: 14

उदय जाधव, मुंबई

7 सप्टेंबर

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सध्या सगळीकडे इकोफ्रेंडली गणेश मूतीर्ंची संख्या वाढत आहे. त्यातच आता गिरगावच्या कुडाळ देशकर मंडळाने फायबरची कायमस्वरुपी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या देखाव्यांतून अनेक विषयांबरोबरच पर्यावरण जनजागृतीही आवर्जून केली जाते. पण खुद्द गणपती बाप्पाच प्लॅस्टरपासून बनवले जात असल्याने गणेशोत्सवातील पर्यावरणाचा धोका वाढला आहे. हे टाळण्यासाठीच कुडाळकर मंडळाने फायबरपासून गणपती तयार केला आहे.

गणपती बाप्पांच्या सजावटीतूनही पर्यावरणाचाच संदेश दिला गेला आहे. या मंडळाने शाडू किंवा कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवणे टाळले आहे.

हा गणपती विसर्जित न करता वर्षभर ठेवला जाणार आहे. दर मंगळवारी आणि संकष्टीला त्याची पूजा-अर्चा केली जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातीला भक्तिभाव वर्षभर राहील, अशी या मंडळाची श्रद्धा आहे.

close