नाशिकमध्ये द्राक्षे फेकली रस्त्यावर

September 8, 2010 11:51 AM0 commentsViews: 7

8 सप्टेंबर

नाशिकमध्ये आज द्राक्षे रस्त्यावर फेकण्यात आली. अपेडाने रेसेड्यू मॉनिटरिंग प्लॅनमध्ये क्लोरोमीक्वेट क्लोराईट या रसायनाचा समावेश करण्यास विलंब केला. त्याचा फटका द्राक्षाच्या निर्यातीला बसला.

भारतातून निर्यात करण्यात आलेली 182 कोटी रुपयांची द्राक्षे परदेशात नाकारण्यात आली. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे आणि निर्यातदारांचे अतोनात नुकसान झाले.

आडगावचे द्राक्ष उत्पादक विलास शिंदे यांचा कंटेनर तब्बल 8 देश फिरून भारतात परत आला आहेय. आडगाव नाक्यावर हे द्राक्ष फेको आंदोलन करून रस्ता रोको करत सरकारचा निषेध करण्यात आला.

close