साहित्य संमेलनाच्या कोषाध्यक्षांचा राजीनामा

September 8, 2010 11:57 AM0 commentsViews: 2

8 सप्टेंबर

साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच आता वादालाही सुरुवात झाली आहे. ठाण्यात होणार्‍या साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष चिंतामणी कारखानीस यांनी राजीनामा दिला आहे.

कारखानीस यांनी अंतर्गत वादातून राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आर्थिक व्यवहार पारदर्शक व्हावेत, यासाठी आपण काही सूचना केल्या होत्या. त्याकडे दुलर्क्ष होत असल्याने आपण राजीनामा दिल्याचे कारखानीस यांनी सांगितले.

पुण्यातील संमेलनाच्या खर्चावरून झालेला वाद चांगलाच गाजला आहे. आता ठाणे संमेलनही गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

close