ट्रेनचे श्रेय लाटण्यासाठी राडा

September 8, 2010 12:10 PM0 commentsViews: 1

8 सप्टेंबर

नव्यानं सुरु झालेल्या दादर- सावंतवाडी ट्रेनचे श्रेय लाटण्यासाठी नारायण राणे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणीमारी झाली.

ही हाणामारी दादर स्टेशनवर रात्री 11.30 वाजता सुरु झाली. रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही ट्रेन दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफॉर्म नंबर चारवर येण्याआधीच नारायण राणे यांनी त्यांच्या दोन मुलांसह गाडीचे अनौपचारिक पध्दतीने नारळ फोडून उद्घाटन केले. यावेळी राणे समर्थकही उपस्थित होते.

तर गाडी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत गाडीच्या इंजीनावर भगवे झेंडे लावले. आणि शेवटी खाजदार संजय राऊत यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवताच गाडी रवाना झाली.

पण या ठिकाणी झालेल्या हाणामारीत 3 पोलीस जखमी झालेत. तर अनेक कार्यकर्तेही यात जखमी झाले. यामुळे नागरिकांचे मात्र हाल झाले. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणार्‍या चाकरमान्यांना मात्र याचा प्रचंड त्रास झाला.

दादर स्टेशनवर झालेल्या गर्दीमुळे अनेकांना गाडीमध्ये चढता आले नाही. त्यामुळे त्यांना स्टेशनवरच रात्र काढावी लागली.

तर आज दुपारी सव्वा अकराच्या दरम्यान ट्रेन कणकवली स्टेशनवर आली तेव्हा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिचे स्वागत केले. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही प्रकारचा गैरप्रकार घडला नाही.

close