नाशिकची गुरुकुल मराठी शाळा मान्यतेविनाच

September 8, 2010 12:12 PM0 commentsViews: 10

8 सप्टेंबर

नाशिकच्या सिन्नरमधील गुरुकुल या मराठी शाळेला सरकारने मान्यता नाकारली आहे. संस्थाचालकांनी सातत्याने 4 वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही शाळेला मान्यता देता येणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले.

अखेर याविरोधात संस्थाचालकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सरकारला 14 जूनपर्यंत या शाळेची पडताळणी करून त्वरीत मान्यता द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र सरकारने कोर्टाच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे.

मान्यता तर सोडाच, शाळा बंद करा नाहीतर 1 लाख रुपये दंड भरा, अशी नोटीसच शाळेला आली आहे. शाळा बंद केली नाही तर दर दिवशी 10 हजार रुपये दंड भरा, असा दमही देण्यात आला आहे.

सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे गुरुकुलसारख्या अनेक शाळा धोक्यात आल्या आहेत.

close