शायनीच्या मोलकरणीने जबाब फिरवला

September 8, 2010 12:16 PM0 commentsViews: 5

8 सप्टेंबर

शायनी आहुजा बलात्कार प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पीडित मोलकरणीने घुमजाव करत आपल्यावर बलात्कार झालाच नाही, असे फास्ट ट्रॅक कोर्टात सांगितले.

आपल्याला ज्या महिलेने नोकरी दिली, तिने दबाव आणल्याने आपण शायनीवर बलात्काराचा आरोप केला, असा जबाब या मोलकरणीने कोर्टात दिला आहे.

मोलकरणीने असा जबाब दिला असला, तरी ही केस सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

close