परदेशी विद्यार्थी रमले गणेशमूर्ती साकारण्यात

September 8, 2010 12:23 PM0 commentsViews: 7

प्राची कुलकर्णी, पुणे

8 सप्टेंबर

गणेशोत्सवाची धूम अनुभवण्यासाठी अनेक परदेशी लोक महाराष्ट्रात येत असतात… पण पुण्यातील एका ग्रुपला मात्र अजून चांगला अनुभव मिळाला आहे.

यूथ एक्सचेंज प्रोग्रॅमअंतर्गत पुण्यात आलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांनी चक्क गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.

गोखलेनगरमध्ये सुरू असलेल्या या प्रशिक्षणात सॅम, जेमी, जस्टीन हे अमेरिकन विद्यार्थी सहभागी झाले.

पुण्यातल्या शास्त्रवाहिनी या संस्थेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

close