कॉमनवेल्थ बॅटन कोल्हापुरात

September 8, 2010 1:32 PM0 commentsViews: 5

8 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सची क्विनस् बॅटन रिले आज महाराष्ट्रात दाखल झाली. कर्नाटकने ही बॅटन महाराष्ट्र ऑलिपिंक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याकडे कागलमध्ये सुपूर्द केली.

कागल शहरातून बैलगाडीवरून बॅटनची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये क्रिडाप्रेमी आणि विद्यार्थी सहभागी झाले. यानंतर ही बॅटन कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी या बॅटनचे स्वागत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

तर ही बॅटन रिले फिरवण्याचा मान कोल्हापुरातून गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत, राही सरनौबत, मंदार दिवसे, यांच्यासह 55 खेळाडू आणि प्रशिक्षकांना मिळाला.

त्याचबरोबर आमदार सतेज पाटील, चंद्रदिप नरके, सुजित मिंचेकर हेही या बॅटन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

close