जर्मन बेकरीतील बॉम्ब बनला उदगीरमध्ये

September 8, 2010 3:33 PM0 commentsViews: 7

8 सप्टेंबर

पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेग याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचल्याची माहिती पुढे येत आहे.

या स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब उदगीर याच ठिकाणी तयार करण्यात आले होते. हिमायत बेग हा डी. एड.चा प्रथम वर्षातील नापास विद्यार्थी आहे. तो बीड जिल्ह्यातील मूळ निवासी आहे.

गेल्या वर्षी हिमायत उदगीर इथे आला आणि व्यवसाय सुरु केला. हा इंटरनेट कॅफे नगरपरिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गजबजलेल्या ठिकाणी आहे. पुणे एटीएस पथक इथे आले असून तपास सुरू आहे.

या प्रकरणी आणखी 5 ते 6 जणांना अटक होईल, असे एटीएस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

close