बाबरी-रामजन्मभूमी वादाचा निकाल 24 रोजी

September 8, 2010 3:55 PM0 commentsViews: 19

8 सप्टेंबर

बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादाचा अंतिम निकाल येत्या 24 सप्टेंबरला लाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात लागणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त पावणे तीन एकर जमिनीचे नेमके काय करायचे, याचा निर्णय कोर्ट घेणार आहे. ही जमीन बाबरी मशिदीला मिळणार, की या ठिकाणी राममंदिर होणार, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या 18 वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. निकाल लागल्यानंतर तीव्र भावनिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

केंद्राने निमलष्करी दलाच्या आणखी तुकड्या पाठवाव्यात, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने आहे. तसेच सर्वच राज्यांना केंद्राने दक्षतेची सूचना केली आहे.

close