हे आहेत, स्फोटातील आरोपी…

September 8, 2010 3:57 PM0 commentsViews:

8 सप्टेंबर

बॉम्बस्फोटातील हे आरोपी नेमके कोण आहेत, त्यावर एक नजर टाकूया…

हिमायत बेग

मे 2006 मध्ये मनमाड आणि औरंगाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला होता. त्यावेळी हिमायत बेग पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि गेल्या दीड वर्षांपासून त्याने उदगीरमध्ये ग्लोबल इंटरनेट कॅफे सुरू केले. हाच हिमायत पुणे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

अकबर चौधरीने त्याची ओळख इक्बाल आणि रियाझ भटकळ या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांशी करून दिली होती. फय्याझ कागझी, झैबुद्दीन अन्सारी आणि इकबाल आणि रियाझला त्याने जवळ आणले. औरंगाबाद आणि इंडियन मुजाहिद्दीन हे दोन्ही मॉड्यूल त्याने एकत्र आणले. पुण्यात त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत.

शेख लालबाब उर्फ बिलाल

बीएससीच्या पहिल्या वर्षी शेख लालबाब उर्फ बिलाल नापास झाला. तो नाशिकमध्ये सीएनसी ऑपरेटरचे काम करत होता. सरकारी इमारतींची रेकी करण्याचं मुख्य काम याच्याकडे होते. आमीर माणिक बेग या नावाने पुण्यातून त्याने ड्रायव्हिंग लायसन्स घेतले. तर सुतार मुनीर इकबाल या नावाने त्याने रहिवासी दाखला काढला. नाशिकमध्ये तो सुपर सेल चालवत होता. पाकिस्तानातून येऊन त्याने नाशिकमध्ये आश्रय घेतला होता.

आणखी दोघे फरार

बॉम्बस्फोटातील आणखी दोन आरोपी आहेत, मोहसीन चौधरी आणि मोहम्मद अहमद दरार सिद्दीबाबा उर्फ यासीन उर्फ शाहरुख. हे दोघेही उदगीरमधील बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला हजर होते. मोहसीन चौधरीने बॉम्ब बनवण्यासाठी स्फोटके आणली होती. तर यासीन याने जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवले होते. हे दोघेही आता फरार आहेत.

close