बिलालने केली नाशिकची रेकी

September 9, 2010 10:26 AM0 commentsViews: 3

9 सप्टेंबर

जर्मन बेकरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बिलालने नाशिकच्या महत्त्वांच्या ठिकाणांची पाहणी केल्याचे सिद्ध झाले आहे. या ठिकाणांचे त्याने फोटोही काढले होते.

नाशिक हे अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. नाशिकमधील पोलीस ट्रेनिंग ऍकॅडमी, पोलीस आयुक्तालय, सेंट्रल बस स्टँड आणि मिल्ट्रीच्या देवळाली कँम्पची पाहणी बिलालने केली होती.

बिलाल गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये राहत होता, अशी माहिती एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनीही काल पत्रकार परिषदेत दिली होती.

close