विदर्भामध्ये जोरदार पाऊस

September 9, 2010 10:32 AM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

विदर्भामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. आणि त्यामुळे धरणांची पातळी वाढलेली आहे. वर्ध्यामध्ये निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेत.

तर अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील नांद धरणाचे 5 दरवाजे उघडलेत तर बोर धरणाचे 9 दरवाजे उघडले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. बोर नदीला आलेल्या पुरामुळे समुद्रपूर तालुक्यातील नांदरा गावाला पाण्याने वेढले आहे.

तर शेलू तालुक्यातील हिंगणी, मोही, घोराड इथे घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. वाघेडा पुलावरुन पाणी वाहत असल्याने समुद्रपूर – मांडगाव रस्ता बंद झाला आहे. पूर परिस्थिती असूनही आतापर्यंत कोणतेही अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले नाहीत.

आमदार सुरेश देशमुख आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जैसवाल यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली.

close