मोदी आणि बीसीसीआयमध्ये पुन्हा वाद

September 9, 2010 10:39 AM0 commentsViews: 6

9 सप्टेंबर

ललित मोदी आणि बीसीसीआय यांच्यातील वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. यावेळी ललित मोदींनी बीसीसीआय विरुद्द कोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीतून चिरायू अमीन आणि अरुण जेटली यांना वगळावे, अशी मागणी मोदींनी केली होती.

ही मागणी बीसीसीआयने फेटाळली होती. त्यावर आता मोदींनी कोर्टात गार्‍हाणे नेले आहे.

येत्या 13 सप्टेंबरला मोदी यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

close