कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

September 9, 2010 10:54 AM0 commentsViews: 6

9 सप्टेंबर

कोल्हापूर शहराच्या थेट पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटावा आणि कष्टकरी कामकार शेतकरी यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज कोल्हापुरच्या दौर्‍यावर आले आहेत. मुख्यमंत्र्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

close