अनधिकृत बांधकाम तोड माहिमेविरुद्ध मोर्चा

September 9, 2010 10:56 AM0 commentsViews: 3

9 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत घरें जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर महानगरपालिका एमआयडीसी, सिडको, कलेक्टर आणि वनविभागाने या कारवाईस सुरुवात केली आहे.

आतापर्यंत सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे तोडायला सुरुवात झाली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील अनधिकृत राहती घरे जमीनदोस्त केली जाणार आहेत.

याच्या विरोधात शिवसेना आणि भाजपतर्फे नवी मुंबईत घर बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज आंदोलकांनी नवी मुंबई महापालिका,सिडको आणि एमआयडीसीवर मोर्चा काढला.

या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.

close