नागपुरात मारबत मिरवणूक

September 9, 2010 10:58 AM0 commentsViews: 5

9 सप्टेंबर

तान्ह्या पोळ्याच्या दिवशी नागपूरमध्ये मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

या निमित्ताने समाजातील वाईट चालीरिती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.

मारबतीच्या मिरवणुकीत हजारो लोक सामील झाले. बडग्या म्हणजे माणसाची प्रतिकृती. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.

या वर्षी आरक्षणाच्या विषयावर बडग्या निघाला आहे.

close