नागपुरात बस धुवा आंदोलन

September 9, 2010 11:04 AM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

केंद्र सरकारच्या जएनयूआरएम अंतर्गत नागपूर शहरात वाहतुकीसाठी अडीचशे बस महापालिकेला दिल्या आहेत. पण गेल्या 2 वर्षांपासून यापैकी काही बस अडगळीत पडून आहेत.

त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीही होत नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. तर रस्त्यांवर धावणार्‍या अनेक बसही खराब झाल्या आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील अनेक बस पाण्याने धुतल्या.

महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला.

close