भारताच्या युद्धसज्जतेवर कॅगेचे ताशेरे

October 25, 2008 5:48 PM0 commentsViews: 4

25 ऑक्टोबर, दिल्ली भारताच्या युद्धसज्जतेवर कॅग या केंद्र सरकारी संस्थेनं सवाल उठवला आहे. सरकारी खात्यांचं ऑडिट करणार्‍या कॅगचा अहवाल आला आहे. भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त पाणबुड्या नादुररुस्त तसंच कालबाह्य असल्याचं याअहवालात म्हटलंय. भारताच्या युद्धसज्जतेवर कॅग या केंद्र सरकारी संस्थेनं सवाल उठवलाय. भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त पाणबुड्या नादुरूस्त तसंच कालबाह्य असल्याचं या अहवालात म्हटलंय. तीन दशकांपूर्वीचे रडार्स शत्रूच्या हल्ल्याला तोंड द्यायला समर्थ नसल्याचं त्यात म्हटलंय. भारतीय नेव्ही आणि एअरफोर्सच्या अक्षमतेवर या अहवालात बोट ठेवण्यात आलं आहे.कॅगच्या अहवालानुसार फक्त 48 टक्के पाणबुड्या युद्धासाठी सज्ज आहेत. इतर पाणबुड्या नादुरुस्त आहेत. 50 टक्के पाणबुड्या त्यांच्या मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत तर 63 टक्के पाणबुड्या 2012 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. या पाणबुड्या केवळ जुन्याच झाल्या नाहीत तर त्यांची संख्याही खूपच कमी आहे. ही निराशा इथंच संपत नाही. भारताचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं महत्त्वाचं क्रूस मिसाईल योग्य काम करत नसल्याचं आढळून आलंय. हवाईदलाचं ह्रदय समजल्या जाणार्‍या रडार्सचीही हीच अवस्था आहे. कालबाह्य झालेल्या 37 वर्षांपूर्वीच्या योजनेनुसार त्यांचं काम चालतं. महत्त्वाच्या रडार्सरच्या कमतरतेचं प्रमाण तब्बल 76 टक्के आहे. हवाई हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी किंवा शत्रूवर हवाई हल्ला करण्यासाठी भारत सक्षम नसल्याचं कॅगच्या अहवालातून उघड झालं आहे.

close