बॅटन रिलेचे सातार्‍यात स्वागत

September 9, 2010 11:10 AM0 commentsViews: 4

9 सप्टेंबर

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सच्या क्विन्स बॅटन रिले सातार्‍यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिल्लीकडे निघालेली ही बॅटन सकाळी 11 वाजता सातार्‍यातील पवईनाका येथे पोहचली.

यावेळी शिवाजी सर्कल येथे सातार्‍याचे जिल्हाधिकारी संभाजी कडू-पाटील यांनी बॅटनचे स्वागत केले. नंतर ही बॅटन शहरातून राजपथमार्गे राजवाडा आणि तिथून पवईनाका अशी फिरवण्यात आली.

यावेळी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close