शेतकरी संघटनेने साखरेचा ट्रक पेटवला

September 9, 2010 11:23 AM0 commentsViews:

9 सप्टेंबर

उसाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने छेडलेल्या आंदोलनाने आज तीव्र स्वरुप धारण केले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड इथे साखर घेवून चाललेला ट्रक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिला.

रेल्वे पुलावरुन चाललेला हा ट्रक थांबवून चालक आणि वाहकाला बाहेर काढून कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवून दिला.

या आंदोलनाअंतर्गत कार्यकर्ते साखर कारखान्यातून साखरेची उचल होऊ देत नाही.

close