हैदराबादी हलीमला मिळणार पेटंट

September 9, 2010 11:27 AM0 commentsViews: 9

प्रीती सिंग, हैदराबाद9 सप्टेंबर

गणेशोत्सव आणि ईद यावर्षी एकाच वेळी आले आहेत. रमझान महिन्यात खाद्यपदार्थांची रेलचेल असते. खास महत्त्व असते ते हलीमला. या हलीमला आता एक नवी भौगोलिक ओळख मिळणार आहे.

हैदराबादी हलीम आता अधिकृतपणे आंध्रप्रदेशची खास संपत्ती जाहीर होणार आहे. म्हणजेच त्याला पेटंट मिळणार आहे…

जर तुम्ही पट्टीचे खवय्ये असाल, तर तुम्ही हैदराबादी बिर्याणीबद्दल निश्चितच ऐकले असणार. पण आता बिर्याणीसोबतच हलीमही निझामाच्या या शहराची खास ओळख बनणार आहे.

रमझानमधील या स्पेशल डीशला लवकरच विशिष्ट भौगोलिक ओळख मिळणार आहे. त्यामुळे हलीम ही आंध्रप्रदेशची अधिकृत मालमत्ता बनेल…

मटण आणि गव्हापासून, रमझान महिन्यातील हा खास पदार्थ तयार करण्यासाठी कामगार 12 तास काम करतात. उपवास सोडून संध्याकाळच्या नमाजनंतर हजारो जण हलीमचा आस्वाद घेतात.

हलीम खूपच लोकप्रिय झालीय. आणि त्यामुळे येथील काही हॉटेल्सनी ही हलीम आता सातासमुद्रापार नेली आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांतील मोठ्या एनआरआय मार्केटमध्ये हलीम निर्यात केली जाते.

खरेदीचे वेड असणार्‍यांसाठीही रमझान महिन्यात चंगळ असते. चारमिनारमधील गल्ल्या रात्रंदिवस खरेदीदारांच्या स्वागतासाठी सजलेल्या असतात. ईदसोबत गणेशोत्सोवही साजरा होतो. त्यामुळे सारे वातावरणच उत्सवमय झाले आहे.

close