प्रदेशाध्यक्ष पदासाठी उल्हास पवार चर्चेत

September 9, 2010 12:03 PM0 commentsViews: 3

9 सप्टेंबर

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 17 सप्टेंबरला निवडणूक होत आहे.

माणिकराव ठाकरे यांचेच नाव पुन्हा प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा माणिकराव ठाकरे यांच्या नावाला विरोध असल्याचे समजते.

विलासराव गटाकडून आमदार उल्हासदादा पवार यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची ही निवडणूक चुरशीची बनली आहे.

दरम्यान, पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी गुलचैनसिंह चरक यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन जारी केले आहे.

त्यानुसार 12 आणि 13 सप्टेंबर या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा आहेत. तर 15 सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तसेच 17 सप्टेंबरला मतदान होणार आहे.

close