हिमायत बेग बीडचा राहणारा…

September 9, 2010 10:58 AM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

जर्मन बेकरीतील मुख्य आरोपी मिर्झा हिमायत बेग हा बीडच्या जुना बाजार भागातील कागोडवाडा या गल्लीत मागील 27 वर्षापासून आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता.

बीडच्या मिल्लीया विद्यालयात तसेच याच संस्थेच्या महाविद्यालयात त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. शाळेत तसेच महाविद्यालयीन शिक्षणात जेमतेम असलेला हिमायत जर्मन बेकरी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

एवढेच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही तसेच वाटत आहे. हिमायतला या घटनेत फसविले असल्याचे बेगचा मोठा भाऊ तारेक बेग आणि वडील मिर्झा हिमायत बेग यांना वाटत आहे.

close