महापालिकेकडून विसर्जनाचीही तयारी

September 9, 2010 12:35 PM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

गणेशोत्सवाला आता फक्त एक दिवस राहिला आहे. सगळीकडे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई महापालिकेनेही आता गणेशोत्सवासाठी तयारी केली आहे.

शहरात श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत. तर मोठ्या तलावांच्या स्वच्छतेचे काम सुरु आहे. त्यातच सायनचा गर्दीच्या ठिकाणी असलेला तलाव सगळ्यात अस्वच्छ असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हा तलाव खासगी ट्रस्टकडे असल्याने त्याची स्वच्छता राहिल्याचे महापौरांनी मान्य केले आहे.

महापालिकेची तयारी पुढीलप्रमाणे…

1. शहरात एकूण 60 विसर्जन स्थळे असतील. यात 19 कृत्रीम तलाव तयार करण्यात आलेत. तर 11 मोठ्या तलावांच्या सफाईचे काम सुरू आहे.

2. विसर्जन स्थळावर 214 लाईफ गार्ड तैनात केले जाणार. कृत्रीम तलावांवर यंदा 8 कोटी रुपये खर्च.

close