सामना नैसर्गिक संकटाशी…

September 9, 2010 12:42 PM0 commentsViews: 3

प्राची कुलकर्णी, पुणे9 सप्टेंबर

पूर, भूकंप या संकटांसोबतच आता न्यूक्लिअर रेडिएशन, केमिकल लिकेज यांसारख्या संकटांचाही सामना करावा लागत आहे. यासाठीच पुण्यातील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने खास टेक्निक्स डेव्हलप केली आहेत.

ही टेक्निक्स सादर करण्यासाठी ऍसि-स्टेक्स 3 या ट्युनेशिया मध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी एनडीआरएफच्या टिमला मिळाली आहे.

एखाद्या ठिकाणी अडकलेले लोक आणि तिथे होत असलेली केमिकलची रिऍक्शन. ज्यामुळे लोक बेशुद्ध पडत असतात.. यासाठी सज्ज होते एनडीआरएफची संपूर्ण टिम…

अत्याधुनिक कॅमेर्‍यांच्या मदतीने सगळे जखमी लोक शोधले जातात. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बचावकार्य सुरू होते.

ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करण्याऐवजी एनडीआरएफनी खास तंत्रज्ञान तयार केले आहे. या बॅगमध्ये हवा भरुन ढिगार्‍याखालच्या माणसाला अलगद बाहेर पडण्यास मदत केली जाते.

पण त्यांना बाहेर काढले तरी, प्रश्न राहतो तो त्यांच्यावर होत असलेल्या केमिकल रिऍक्शन्सचा. यासाठी खास डीटॉक्सिफायिंग सेक्शन तयार करण्यात आले आहे.

या कॉन्फरन्ससोबतच दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्ससाठीही फर्स्ट टास्क फोर्स म्हणून एनडीआरएफची निवड झाली आहे. कोणतेही जैविक किंवा रेडिओलॉजिकल संकट असले तरी त्याचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज झाली आहे.

close