पीएमपीएलच्या कामगारांचे आंदोलन

September 9, 2010 1:00 PM0 commentsViews: 5

9 सप्टेंबर

विविध मागण्यांसाठी पुण्यातील पीएमपीएल बसच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली आहे. या आंदोलनामुळे शंभरपेक्षा जास्त बसेस रस्त्यावर धावू शकलेल्या नाहीत.

त्यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. कंत्राटी कामगार मंचचे नेते दिलीप मोहिते हे गेल्या 3 दिवसांपासून महापालिकेसमोर उपोषणाला बसलेत.

3 वर्षांपूर्वी महापालिकेने कंत्राटी कामगारांची भरती केली. पण साप्ताहिक सुट्टी लागू करणे, निवृत्त कर्मचार्‍यांच्या जागी या कंत्राटी कामगारांची वर्णी लावणे. ईएसआय लागू करून कार्डस् वाटप करणे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव तसेच कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी या कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

close