इकोफ्रेंडली तलाव होतायत लोकप्रिय

September 9, 2010 2:56 PM0 commentsViews: 1

9 सप्टेंबर

इकोफ्रेंडली गणपती आणि त्यांच्या विसर्जनासाठी इकोफ्रेंडली तलाव ही संकल्पना आता लोकप्रिय होताना दिसत आहे. चेंबूरच्या पेस्तम सीटिझन फोरमने इकोफ्रेंडली विहिरी तयार केल्या आहेत.

फोरमच्या सदस्यांनी एकत्र येऊन चार कृत्रिम विहिरी तयार केल्या आहेत. ज्यामध्ये परिसरातील छोट श्रीगणेशाच्या मूतीर्ंचे विसर्जन होते.

गेल्या वर्षी सीटिझन फोरमने ही संकल्पना राबवली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यावर्षी या ठिकाणी 4 विहिरी या ठिकाणी आता करण्यात आल्या आहेत. निर्माल्य बाजूला काढून त्यापासून इथे खत बनवले जात आहे.

close