आला लालबागचा राजा…

September 9, 2010 3:49 PM0 commentsViews: 141

9 सप्टेंबर

श्री गणेश…चौसष्ट विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी…भक्तांची दु:खं पळवून लावणारा आणि सुख घेऊन येणारा, सुखकर्ता, दु:खहर्ता…

श्री गजानन म्हणजेच आपला लाडका गणपती बाप्पा…त्याचं आगमन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलंय…

मुंबई, पुण्यासोबतच महाराष्ट्रात घराघरांत गणरायाच्या आगमनाची धांदल उडालीय…

मुंबईकरही ज्याची आतुरतेनं वाट पाहतायत, अशा लालबागच्या राजानं आजच भक्तांना मनोहारी मुखदर्शन दिलं…आणि 'गणपती बाप्पा मोर्या'च्या ललकारीनं मुंबापुरी दुमदुमून गेली…

close