महापौरांनी केली शिक्षकांना मारहाण

September 9, 2010 5:48 PM0 commentsViews: 6

9 सप्टेंबर

महापौरांनीच शिक्षकांना जाहीर कार्यक्रमात, तेही खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच मारहाण केल्याचा प्रकार आज कोल्हापुरात घडला.

मुख्यमंत्र्याचे भाषण सुरु असताना या शिक्षण सेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोल्हापूरचे महापौर आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तसचे त्यांच्या समर्थकांनी शिक्षण सेवकांना मारहाण केली.

कोल्हापूर महानगरपालिकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काँग्रेस पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण सेवकांवर होणारा अन्याय दूर करा, अशी मागणी करत सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही मारहाण करण्यात आली.

close