टाळ-मृदुंगाच्या गजरानं दिल्ली दुमदुमली

October 26, 2008 10:09 AM0 commentsViews: 88

26 ऑक्टोबर, दिल्लीटाळ- मृदुंगाच्या तालावर संत तुकाराम महाराजांची 400 वी जयंती राजधानी दिल्लीत पाच दिवस साजरी झाली. या उत्सवाचा समारोप राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दिल्लीच्या छतरपूरमध्ये जणू पंढरी अवतरली होती.हरीनामाचा गजरानं तुकोबारायांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली. हा जन्मोत्सव देहू किंवा पंढरीत नाही तर थेट राजधानी दिल्लीत झाला. तुकोबांची महती सार्‍या देशाला कळावी, ही त्यामागची भावना होती. पाच दिवस चाललेल्या या भक्तीमय सोहळ्याची सांगता राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या वारकर्‍यांनी पाच दिवस विश्वशांती गाथेचं पारायण केलं. टाळ मृदुंगाच्या गजरामुळेदिल्लीतील छतरपूरला जणू पंढरीचंच रुप आलं होतं.

close