सणांवर आचारसंहिता लागण्याची शक्यता

September 10, 2010 11:21 AM0 commentsViews: 4

10 सप्टेंबर

ठाण्यात साजर्‍या होणार्‍या सणांवर आता आचारसंहितेचा लगाम लागण्याची शक्यता आहे.

दहिहंडी, गणेशोत्सव, दांडिया यांसारख्या सणांचा वापर, राजकारणी कुरघोडी करण्यासाठी करत आहेत. त्यात नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा सण साजरे करताना, नागरिकांना वेठीस धरू नये. सण साजरे करताना नियमांचे पालन करावे, अशा आशयाची याचिका, डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केली होती.

त्यावर निर्णय देताना, मुंबई हायकोर्टाने, गृहखात्याने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली, एक समिती नेमून, ठाण्यात सार्वजनिकरित्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सर्वच सणांबाबत आचारसंहिता ठरवावी, असे आदेश दिले आहेत.

close