हरणाची शिकार करणार्‍यास अटक

September 10, 2010 11:59 AM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. चिकरी पवार असे त्याचे नाव आहे.

पहाटेच्या सुमारास तीन साथीदारांसह त्याने हरणाची शिकार केली. त्याचे मांस शिजवण्याच्या तयारी करत असतानाच टेंभे गावच्या गावकर्‍यांनी त्यांना पकडले.

दरम्यान त्यापैकी तिघे फरार झाले आणि चिकरी पवार याला गावकर्‍यांनी पकडले. आणि वनखाते अधिकार्‍यांच्या मार्फत पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे आरोपी धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावातील रहिवासी आहेत.

close