दादरमध्ये वृद्धेचा खून

September 10, 2010 12:02 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

मुंबईत काल रात्री दादरच्या आदर्शनगर भागात एका 78 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. सीता आनंद नारायण असे या महिलेचे नाव आहे.

सीता यांचे पती आनंद ज्यावेळी घरी आले तेव्हा सीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

close