बदलापूरमधील खासगी हॉस्पिटल्स आज बंद

September 10, 2010 12:05 PM0 commentsViews: 4

10 सप्टेंबर

बदलापूरमधील सगळी खासगी हॉस्पिटल्स आज बंद आहेत. बदलापूरमधील साईकृपा हॉस्पिटलची गुरुवारी पहाटेच्या सुमारास तोडफोड करण्यात आली होती.

या हॉस्पिटल मध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या सविता देशमुख यांचा आज पहाटे 5 च्या सुमारास प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. सविताचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत सविताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

हॉस्पिटलमधील खुर्च्या, काचा, फॅन यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड क रण्यात आली आहे. या वेळी प्रसुतीसाठी हजर असलेले डॉ. जयदिप चॅटर्जी यांना सविताच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.

डॉ. जयदिप बदलापूरच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

close