दबंगमधील सलमानची चर्चा

September 10, 2010 12:28 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

दबंग सिनेमात सलमान खान भ्रष्टाचारी पोलीस अधिकार्‍याची भूमिका साकारत आहे. बॉलिवूडमध्ये याआधी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस अधिकारी साकारले आहेत.

वाँटेडमध्ये पोलीस अधिकार्‍याची भूमिका केल्यानंतर, सल्लूमियाँ आता दबंगमध्ये पुन्हा एकदा तशीच भूमिका करत आहे. पण यावेळी तो आहे, चुलबुल पांडे.

एक भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी. बॉलिवूडच्या खास पोलीस अधिकार्‍यांवर एक नजर टाकू या…

जंजीर सिनेमाचा प्रामाणिक पोलीस अधिकारी विजय खन्नाला कोण कसे विसरणार? अमिताभ बच्चनने साकारलेल्या विजय खन्नाने एक इतिहास निर्माण केला.

जंजीर हा अमिताभचा पहिला हिट सिनेमा, 1973सालचा. या सिनेमानेच एका अँग्री यंग मॅनला जन्म दिला.अमिताभ बच्चनचाच शक्ती सिनेमा पोलीस अधिकारावर झोत टाकतो.

पण या सिनेमात खाकी वर्दी घातली होती दिलीप कुमारने. दिलीप कुमारचा डीसीपी अश्विन कुमार आपल्या मुलाच्या अपहरणकर्त्याशी समझोता करायला नकार देतो.

शक्तीमध्ये दिलीप कुमार यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय समोर आला आहे. बॉलिवूडने काही वाईट पोलीस अधिकार्‍याची भूमिका साकारणारे चांगले पोलीस दिले.

सुभाष घईंच्या रामलखनमध्ये अनिल कपूर भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर लखन प्रताप सिंग बनला. अर्थात, याचा शेवट चांगला होतो.आणि आमीर खानचा सरफरोशमधला एसीपी अजय सिंग राठोड तर दहशतवाद्याला पकडून देतो.

पाकिस्तानचा गझल गायकच दहशतवादी असतो, अशी सिनेमाची संकल्पना आहे. कंपनी सिनेमातील मोहनलाल सगळ्यांच्याच लक्षात राहिला.

अजय देवगण आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबतच सिनेमातील इन्स्पेक्टर मोहनलाल महत्त्वाची व्यक्तिरेखा होती.एकूणच बॉलिवूडचे हे इन्स्पेक्टर नेहमीच आपला ठसा उमटवून जातात.

close