पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला

September 10, 2010 12:44 PM0 commentsViews:

10 सप्टेंबर

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्याभोवतीचा फास आवळला गेला आहे. सीबीआयने त्यांचे बँक अकाऊंटस् सील केली आहेत.

पाशेकोंचे तीन मोबाईल फोन जप्त केले गेले आहेत. सध्या पाशेको यांची सीबीआयच्या ऑफीसमध्ये चौकशी सुरू आहे.

यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा व्हिसा मिळवल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

close