गणेशोत्सवात घातपाताचा डाव

September 10, 2010 12:49 PM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर

गणेशोत्सवा दरम्यान अतिरेकी मुंबईत घातपात घडवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

दोन परदेशी नागरिक मुंबईत घुसल्याची माहिती जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी दिली आहे. गर्दीच्या ठिकाणी घुसून जास्तीत जास्त हानी करण्याचा यांचा डाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या दोन्ही नागरिकांचे फोटोही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. एकाचे नाव कलिमुद्दीन खान उर्फ रामेश्वर पंडीत आणि दुसर्‍याचे नाव हाफीज शरीफ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नागरिकांनी या फोटोमधील दोघे कुठेही दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

close