साध्वी प्रज्ञासिंगशी भाजपचा संबंध नाही – प्रकाश जावडेकर

October 26, 2008 12:21 PM0 commentsViews: 6

26 ऑक्टोबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हिचे भाजपशी संबंध असल्याचं दिसून येतंय. प्रज्ञा सिंगचे भोपाळ आणि इंदूरमध्ये फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या फोटोंमध्ये ती भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत दिसत आहे. मध्यप्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांनी फेब्रुवारी 2006 मध्ये एका बैठकीत हे फोटो घेतले होते. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अवधेशानंद यांच्याशीही प्रज्ञा सिंगचे संबंध असल्याचं समजतंय. भाजप नेत्यांनी मात्र याचा इन्कार केला आहे तर तपास पूर्ण होईपर्यंत साध्वीला गुन्हेगार ठरवणं चुकीचं असल्याचं उमा भारती यांचं म्हणणं आहे. दरम्यान, एटीएसनं प्रज्ञा ठाकूरच्या जबलपूरमधल्या आश्रमावर छापा टाकला आहे. साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेनंतर तिचे वडील चंद्रपालसिंग ठाकूर म्हणाले, या घटनेत ती दोषी आढळल्यास तिला फाशी किंवा आजन्म कारावास झाला तर खेद वाटणार नाही '. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्याशी भाजपशी संबध असल्याच्या वृत्ताचा जावडेकर यांनी इन्कार केला तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भोपाळमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे.

close