सालेमला सुप्रीम कोर्टाचा धक्का

September 10, 2010 12:50 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. मोक्का रद्द करावा , ही सालेमची विनंती कोर्टाने अमान्य केली आहे.

याचाच अर्थ असाही होतो की पोर्तुगाल सरकारसोबतचा करार असला तरीही अबू सालेमला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

सालेमला भारताच्या ताब्यात देताना त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही, अशी अट पोर्तुगाल सरकारने घातली होती. सध्या अबू सालेम मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील तो दोषी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे अबू सालेमला फाशीची शिक्षाही होऊ शकते

close