गणेशोत्सवासाठी कोकण सज्ज

September 10, 2010 1:20 PM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

कोकणही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत.

गणेश चतुर्थीला उद्या सुरुवात होत असली तरी आज संध्याकाळपासूनच अनेक गणेशभक्तांनी आपापल्या गणेशाच्या मूर्ती वाजत गाजत घरी नेल्या.

महागाईचे सावट जरी या गणेशोत्सवावर असले तरीही आपापल्या पसंतीच्या गणेशमूर्ती करुन घेण्यात कोकणवासियांची कसूर केलेली नाही.

कोकणात प्रामुख्याने शाडू मातीच्याच गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आणि सजावटही पारंपरिक असते. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर दिनेश केळुसकर…

close